Nagpur: विकास हवाच, पण पर्यावरणही जपणे आवश्यक; सिमेंटीकरण, प्रदूषण व वृक्षतोडीमुळे उपराजधानीचा पारा ‘हाय’
Rising Temperature in Nagpur Due to Urbanization: नागपूरमध्ये सिमेंटीकरण, वृक्षतोड आणि वाढत्या प्रदूषणामुळे तापमान झपाट्याने वाढत असून उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
नागपूर: विकासाच्या नावाखाली झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. सिमेंटच्या जंगलामुळे उन्हाळ्यात नागपूरकरांना अक्षरशः भट्टीत तपावे लागते. यावर वेळीच प्रभावी उपाययोजना न केल्यास भयानक दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.