

Nagpur News
esakal
नागपूर: शहरात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात सदृश आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरात आतापर्यंत हीट रॅशचे ३६, हीट एक्झॉशनचे २०, हीट क्रॅम्प्सचे १४ आणि हीट सिंकोपचे ६ असे एकूण ७६ रुग्ण आढळले आहेत. मात्र, सर्वात गंभीर मानल्या जाणाऱ्या हिट स्ट्रोकचा (उष्माघाताच्या) एकही रुग्ण अद्याप नोंदविला नसल्याचा दावा मनपाच्या आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.