
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. धोकेबाज प्रियकराचा गर्भ आपल्याला वाढवायचा नाही, तो पाडण्याची अनुमती द्यावी अशी विनंती तिने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे केली. न्यायालयाने ती मान्य केली आहे.