
नागपूर : अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सहा वर्षानंतर केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करणे म्हणजे हा कायद्याचा गैरवापरच असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. या आधारावर चंद्रपूर जिल्ह्यातील एका सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयाने रद्द केले.