
Nagpur Latest News: आई-वडिलांना आपल्या मुलांकडून पोटगी (देखभाल खर्च) मागण्यासाठी त्यांच्यासोबत राहणे कायद्याने बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे वृद्धांना त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार अधोरेखित झाला आहे. त्यांना सन्मानाने आणि स्वतंत्रपणे जगण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.