

Nagpur High Court
esakal
नागपूर: महानगरपालिका नागरिकांकडून विविध नागरी सुविधांच्या नावाखाली कर घेते. मात्र, त्यांना प्रत्यक्षात खड्डे असलेले रस्ते, रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या आणि पावसाळ्यात घरांचे होणारे नुकसान सहन करावे लागते. नागपूरकरांना मूलभूत सुविधा देणे शक्य नसल्यास कर कशासाठी आकारला जातो, असा संतप्त प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला केला. शहरातील सिमेंट रस्त्यांच्या निगडीत प्रश्नांविरोधात जनमंच संस्थेतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.