

Nagpur
sakal
नागपूर : कायमस्वरूपी भाडेपट्ट्याचे नूतनीकरण केल्यास त्या नूतनीकरणाच्या करारावर स्वतंत्रपणे मुद्रांक शुल्क आकारणे कायदेशीर असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तेजोमय अपार्टमेंट्स कंडोमिनियम आणि न्यू रामदासपेठ गृह निर्माण सहकारी संस्था लि. यांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. यावर निर्णय देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.