
नागपूर : मुलीवर केलेला लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाल्याने उच्च न्यायालयाने ५४ वर्षीय वडिलाला नागपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली २० वर्षांच्या सक्तमजुरीची व २३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने या दोषीला ‘लैंगिक भक्षक’ ठरवत त्याला कमाल शिक्षेस पात्र म्हटले. ही घटना २०१९ मध्ये लावा, वाडी परिसरात उघडकीस आली होती.