Gas Shortage: हिंगणा एमआयडीसी संकटात; आखाती देशांतील युद्धाचा फटका, हजारो कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार
Hingna MIDC Crisis:आखाती देशांतील युद्धाचा थेट परिणाम नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीतील उद्योगांवर दिसू लागला आहे. गॅस पुरवठ्यात मोठी घट झाल्यामुळे सुमारे ३०० ते ४०० लघु-मध्यम उद्योग संकटात सापडले असून उत्पादनात कपात करावी लागत आहे.
नागपूर : आखाती देशांतील युद्धामुळे हिंगणा एमआयडीसीतील उद्योगांसाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे येथील सुमारे ३०० ते ४०० लघु आणि मध्यम उद्योग संकटात सापडले आहेत.