नागपूर: शहरात ‘हिट ॲन्ड रन’च्या घटना वाढत आहेत. २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांतील १०५ घटनांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आणि ८५ नागरिक गंभीर जखमी झाले. ही चिंताजनक आकडेवारी नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे..वर्षभरापूर्वी रामझुला, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क जवळील हिट ॲन्ड रनच्या घटनांची चांगलीच चर्चा झाली. अलीकडेच कोतवाली हद्दीतील वृद्धाला वाहनाने उडवून दिल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, राज्यात अशा घटनांमध्ये नागपूर शहर देशात चवथ्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) २०२४ च्या अहवालातून समोर आले आहे..Nagpur: ‘सीएलबीपी सिस्टम’चे जाळे देशभरात; प्रत्येक शहरात एजंटची नियुक्ती; ‘मर्चंट कॉइन’च्या नावाने फसवणुकीचे प्रकरण.२०२४ मध्ये नागपुरात हिट ॲन्ड रनची ३३१ प्रकरणे नोंदविण्यात आली असून, या घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत १९० तर पुण्यात १२१ प्रकरणे नोंदली गेली असून, त्या तुलनेत नागपुरातील स्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरात २०२४ मध्ये ‘हिट ॲन्ड रन’ची एकूण ५३ हजार २३० प्रकरणे घडली. यामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. यात ७०९ प्रकरणांसह दिल्ली प्रथम स्थानावर असून गाझियाबादमध्ये ४६७ तर पाटणामध्ये ३३२ प्रकरणे समोर आली..कायद्यात सुधारणा आवश्यकया घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा आणी कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक आहे. वाहनांची ट्रेकिंग प्रणाली, जीपीएस आणि सुरक्षा उपकरणे यासारख्या तांत्रिक उपाययोजनांचा वापर करून घटनांची संख्या कमी करता येईल..Amravati: काँग्रेसच्या नगरसेवकांचे आदेश मोडून मतदान ; विधान परिषद निवडणूक; ४५१ पैकी ४२७ मतदारांनी बजावला हक्क.अशी आहे आकडेवारीहिट ॲन्ड रनच्या घटना - १०५मृत्यू - ३५गंभीर जखमी - ८५.तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकताशहरात हिट ॲन्ड रनच्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची आवश्यकता आहे. वाहतूक विभागाला योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. घटनास्थळी तात्काळ वैद्यकीय मदतीची व्यवस्था करणे, वाहन थांबवणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.."हिट ॲन्ड रनच्या घटना साधारणतः मद्यपान आणि अमली पदार्थ घेऊन वाहने चालविणे, अतिवेगाने वाहणे चालविणे आणि लहान मुलांच्या हाती वाहणे देणे तीन बाबींमुळे घडल्याचे दिसते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी दररोज नाकाबंदीसह विकेंड आणि सुटीच्या दिवशी महत्त्वाच्या स्थळी नाकेबंदी करणे, ड्रंक ॲन्ड ड्राईव्हची कारवाई, लहान मुलांच्या हाती वाहणे देणाऱ्या पालकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. सोबतच शाळा, महाविद्यालयात जनजागृतीही गरजेची आहे. पालकांचे समुपदेशनही करणे तितकेच महत्त्वाचे आहे."- जयेश भांडारकर, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त,वाहतूक शाखा, नागपूर शहर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.