Holi Health care Tips: होळी खेळा, पण तब्येत सांभाळा

मुलांची काळजी प्रत्येकालाच असते. मुले रंग खेळण्याचा आग्रह धरतात. पालक त्यांची हा आग्रह पूर्ण करतात. सर्दीत पुन्हा पाण्याच्या थंडपणामुळे सर्दी-खोकला घर करतो.
Holi Health care Tips
Holi Health care Tipssakal

नागपूर - जुन्या जमान्यात फुलांचे रंग आणि त्यातील अर्क काढून रंग बनविला जात असे. परंतु काळ बदलला आणि विविध रासायनिक रंगापासून तर धुळवड साजरी केली जाते. रंगाची बरसात होते मात्र रंगात रासायनिक आणि विषारी घटक असतात याकडे दुर्लक्ष होते.

रंगामुळे डोळ्यांसह त्वचेवर गंभीर परिणाम होतात. दुसरीकडे सर्दी, खोकला हे संसर्ग आजार प्रत्येक मुलांच्या साथीला आहेत. अशा परिस्थितीत सर्दी-खोकल्याच्या संसर्गात धुळवडीतून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञानी वर्तविली आहे.

मुलांची काळजी प्रत्येकालाच असते. मुले रंग खेळण्याचा आग्रह धरतात. पालक त्यांची हा आग्रह पूर्ण करतात. सर्दीत पुन्हा पाण्याच्या थंडपणामुळे सर्दी-खोकला घर करतो. यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत कोरड्या रंगांची होळी खेळण्याचा निर्धार करण्याचा आग्रह धरावा.

ज्यामुळे मुले देखील होळी खेळू शकतात आणि परंपरांचे पालन करून संस्कृती जपली जाईल. पूर्वीच्या काळी सर्दी बॅक्टेरियावर आधारित असायची, अलीकडे होणारी सर्दी ही व्हायरसवर आधारित आहे.

यामुळे सर्दी दीर्घकाळ टिकून राहाते. औषधांचा प्रभावही कमी होत आहे, यामुळे यावर्षी होळी खेळताना केवळ दक्षताच याला आळा घालू शकते, असे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणाले.

Holi Health care Tips
Dhulivandan : फुगे माराल तर सावधान! गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

रंगांमध्ये मेटल ऍसिड...

धुळवडीला विविध कपड्यांना डाईंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगांचा वापरही केला जातो. यात त्यामध्ये मेटल ऍसिड, अल्कली पावडर आणि काच इत्यादी घटक असतात.

काळ्या रंगात लेड ऑक्‍साईड, हिरव्यामध्ये कॉपर सल्फेट, तर लाल रंगात मर्क्‍युरी सल्फेट वापरले जाते. हे सर्व रंग अत्यंत विषारी असून, त्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. परंतु डोळ्यांची जळजळ होणे, अंधत्व येण्याची भीती असते. रंगाला चमक काचेची पावडर असल्यामुळे येतो.

काही रंगांमध्ये ऍस्बेस्टॉसची भुकटी, चॉक पावडर किंवा सिलिकाचा वापरही केला जातो. हा डोळ्यांसाठी घातक आहे, अशी माहिती मेडिकलच्या डॉ. कविता धाबर्डे यांनी दिली.

ज्यांना सर्दी, खोकला आहे अशा मुलांनी रंग आणि पाणी वापरून अजिबात होळी खेळू नये. परंपरेची बाब समजून घेतली तर गुलालाची उधळण करून आणि आनंदाची उधळण करूनही होळी उत्साहात साजरी करता येईल. मुलांची काळजी घेणे आणि त्यांची शारीरिक क्षमता आणि स्थिती पाहून त्यांना होळीमध्ये सहभागी होऊ देणे पालकांची जबाबदारी आहे.

- डॉ. उदय बोधनकर, बालरोग तज्ज्ञ, नागपूर

Holi Health care Tips
Holi : वाईट सारे जळून जावे, चांगले ते उदयास यावे’

धुळवडीला रंग आणि पाण्याने भरलेले फुगे अंगावर फेकतात. वेगाने येणारा फुगा डोळ्यावर आदळल्यास कॉर्नियाला धोका पोचू शकतो. रेटीनाला इजा होऊ शकते. कदाचित डोळा निकामी होण्याची भीतीही असते. डोळ्यात रंग गेल्याने डोळे दुखू लागतात. सूज आल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.

- डॉ. कविता धाबर्डे, सहयोगी प्राध्यापक, नेत्ररोग विभाग, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com