

Nagpur
esakal
नागपूर: वाठोडा ठाण्यातील बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे माँ चंडिकानगर परिसरातील घरफोडीचा मोठा प्रयत्न फसला. पोलिसांनी घरात शिरलेल्या सुशांत थूल (वय ३०, रा. यवतमाळ) या सराईत चोरट्याला रंगेहात अटक करून त्याच्याकडून १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.