

Nagpur News
esakal
नागपूर: सततचे भांडण, घर सोडून माहेरी जाणे आणि घटस्फोटाची धमकी देऊन पतीला मानसिक तणावात ढकलणाऱ्या पत्नीविरुद्ध पाचपावली पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहित जितेंद्र ऊर्फ चंद्रबोसे देसाई (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर पूजा मोहित देसाई (वय ३०, रा. बापदेव मौदा नागपूर, सध्या रा. सूरत) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.