Nagpur Encroachment: माँ उमियाचे अतिक्रमण जैसे थे! हायकोर्टात अवमान याचिका; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

कामठी तरोडी सर्कलच्या जमिनीवरील माँ उमियाचे अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशानंतरही निर्णय न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.
Nagpur Encroachment: माँ उमियाचे अतिक्रमण जैसे थे! हायकोर्टात अवमान याचिका; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

Nagpur Encroachment Action: कामठी तरोडी सर्कलच्या जमिनीवरील माँ उमियाचे अतिक्रमण काढण्याबाबत दिलेल्या आदेशानंतरही निर्णय न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

देवचंद कारेमोरे यांनी ही अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, कामठी तरोडी येथील सर्कल क्रमांक ८८ मधील १.६४ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ३१२ वर्गमीटर जमीन माँ उमिया सहकारी वसाहत लि.च्या मालकीची आहे. संचालक जीवराज पटेल यांच्यातर्फे अतिक्रमण करून माँ उमिया टेक्स्टाईल लि. बांधले जात होते.

या संदर्भात विभागीय अतिरिक्त आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, अतिक्रमण न हटविण्यात आल्याने याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (Latest Marathi News)

न्यायालयाने माँ उमियाचे अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तीन महिन्यांत योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने याचिकाकर्त्याने ही अवमान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

Nagpur Encroachment: माँ उमियाचे अतिक्रमण जैसे थे! हायकोर्टात अवमान याचिका; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस
Video : अयोध्येतील कार्यशाळेतून रामलल्लाची मूर्ती मंदिराकडं रवाना; कडकोट सुरक्षा व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com