Nagpur News: नागपूरकरांची संपन्नता वाढली!

दररोज चाळीसवर कारची विक्री
Nagpur News
Nagpur Newssakal

नागपूर : गेल्या काही वर्षांत नागपूरकरांच्या राहणीमानात आमुलाग्र बदल झाल्याचे राहणीमान सुलभता निर्देशांकात सातत्याने होणाऱ्या सुधारणेवरून दिसून आले. विविध सुविधांमुळे नागपूर अनेकांची पहिली पसंती ठरत असून प्रवासासाठी खर्च करण्याची क्षमता वाढत असल्याचे वाढलेल्या विमानप्रवासी संख्येतून अधोरेखित झाले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत साडेतीन लाखांपेक्षा जास्त नागपूरकरांनी विमानातून प्रवास केला. एवढेच नव्हे आरटीओच्या नोंदीनुसार दररोज चाळीस कारची विक्री होत आहे.

नागपुरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, रुंद रस्ते, आकर्षक चौक, मेट्रो स्टेशन, आंतरराष्ट्रीय विमानतळ, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय सुविधांसह इतर उपलब्ध विकासाची साधने, विकासाच्या उपाययोजना व त्यातून दैनंदिन जीवनशैलीत बदल दिसून येत आहे.

त्यामुळे शहरातील नागरिकांचेही जीवनमान उंचावत आहे. त्यामुळेच मागील वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राहणीमान सुलभता निर्देशांकात नागपूर देशात २५ व्या क्रमांकावर होते. त्यापूर्वी संत्रानगरी ३१ व्या क्रमांकावर होती. आता तर गेल्या काही वर्षांत सुलभ प्रवासावर मोठ्या प्रमाणात खर्च करणारेही आता नागपुरात दिसून येत आहे.

त्यातच विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे माहिती अधिकारात मिहानने आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून पुढे आले. २०२१ मध्ये ७ लाख ९० हजार ४४१ नागरिकांनी नागपूर विमानतळावरून बाहेर उड्डाण घेतले.

२०२२ मध्ये नागपुरातून विमानाने उड्डाण घेणाऱ्यांची संख्या ११ लाख ५४ हजार ०८२ अशी आहे. वर्षभरात नागपुरातून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या ३ लाख ६३ हजार ६४१ ने वाढली असल्याने नागपूरकरांची समृद्धी वाढल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बाहेरून नागपुरात येणाऱ्यांच्या संख्येतही ३ लाख ४५ हजार ८३१ ने वाढ झाली आहे. अर्थात विमानाने ये-जा करणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखांनी वाढल्याचे दिसून येत आहे. नागपुरात व्हीआयपींच्या आगमनाचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

२०२२ मध्ये ९५२ खाजगी विमाने तसेच ४८२ खाजगी विमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. अर्थातच यातून मिहानला ६२ लाख ५९ हजार रुपये भाडे मिळाले.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातही नागपूरकरांचे दरडोई उत्पन्न दोन लाखांवर असल्याची सकारात्मक नोंद आहे. सात वर्षांपूर्वी नागपूरकरांचे दरडोई उत्पन्न हजारांमध्ये होते.

एवढेच नव्हे नागपूरकर दररोज पेक्षा जास्त कार तर दोनशेपेक्षा जास्त दुचाकी खरेदी करीत असल्याचे आरटीओ कार्यालयातील २०२२ च्या नोंदणीतून स्पष्ट झाले. कारमध्ये बीएमडब्लूसारख्या महागड्या कारचाही समावेश आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या समृद्धीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com