
Nagpur Blast
sakal
नागपूर : रात्रीचा काळोख, औद्योगिक परिसरात गडद शांतता आणि अचानक झालेला भीषण स्फोट! क्षणभरात सर्व काही उद्ध्वस्त झालं. धूर, आक्रोश, रक्ताचे डाग आणि ढिगाऱ्याखाली दबलेली स्वप्नं... त्या काळोखातून एक तरुण मात्र कायमचा हरपला. उज्ज्वल भविष्याचं त्याच स्वप्न अपूरंच राहिलं, कारण मयूर दशरथ गणवीर आता कधीच परत येणार नव्हता. स्फोटात त्यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले.