
नागपूर : शहरात वाढत्या अपघातांचे प्रमाण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतीला धावून आली आहे. महानगरपालिकेने ‘स्मार्ट नागपूर’ उपक्रमाअंतर्गत एआय आधारित ‘इंटिग्रेटेड इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयआयटीएमएस) अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे.