
नागपूर : शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मनपाकडून ''आर्टिफिशियल इंटेलिजन्स'' बेस ''वाहतूक सिग्नल सिस्टिम'' लावली गेली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख दहा सिग्नलवर ही यंत्रणा सुरू झाली असून, लवकरच आणखी १५ चौकांमध्ये ती लागणार आहे. हे एआय सिग्नल ऑटोमॅटिक ट्राफिक कंट्रोल सिस्टमद्वारे चालत असून आता बेशिस्त वाहनांवर एआयची करडी नजर राहणार आहे.