

Nagpur Road Accident
esakal
नागपूर: रस्त्यावरील खड्ड्यामुळे ई-बाईक अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या तरुणीला मागून आलेल्या मनपाच्या इलेक्ट्रिक बसने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी कपिलनगर पोलिस हद्दीतील कामठी मार्गावर सायोना पब्लिक स्कूलसमोर घडली.