esakal | नागपूर : दारू तस्करांचा कर्दनकाळ; आयपीएस अश्‍वती दोरजे यांची दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

आयपीएस अश्‍वती दोरजे

नागपूर : दारू तस्करांचा कर्दनकाळ; आयपीएस अश्‍वती दोरजे यांची दहशत

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : वर्धा जिल्हा महात्मा गांधीच्या पदस्पर्शाने पावन झाला असून त्यांच्या भूमित दारू तस्करांचा उन्माद वाढला होता. दारू तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलले गरजेचे होते. त्यावेळी वर्धा जिल्ह्याच्या नवनियुक्त पोलिस अधीक्षक अश्‍वती दोरजे यांनी दारू तस्करांना सळो की पळो करून सोडले होते. दोरजे यांच्या कार्यकाळात दारू तस्करांसह गुन्हेगारांमध्ये चांगली दहशत निर्माण झाली होती.

दोरजे यांना घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला न जाता केरळची राजधानी तिरूअनंतपुरम् शहरात निवडले आणि देशभरात ५४ वी रॅंक मिळवून आयपीएस झाल्या. महिला सुरक्षेला प्राधान्य देऊन महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कार्य करण्याचे त्यांनी ठरविले.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

२००७ मध्ये वर्धा जिल्ह्याचा पदभार असताना दसरा आणि ईद दोन्ही सण मागेपुढे आले होते. यादरम्यान एका दुकानात एक गिफ्ट बॉक्स आला होता. तो बॉक्स उघडताच त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. ही वार्ता लगेच शहरभर पोहचली. त्यामुळे दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अश्‍वती यांनी स्वतः घटनास्थळावर जाऊन बीडीडीएसला पाचारण करून जिलेटीन कांड्यांचा बॉक्स ताब्यात घेतला. पोलिस ठाण्यात नागरिकांचा मोठा जमाव आला. दोरजे यांनी लगेच दोन्ही गटांच्या लोकांत समन्वय साधला. कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेत शहरातील वातावरण शांत केले. या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली. यात त्यांच्यातील नेतृत्वगुण दिसून आले.

नाशिकमधील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या संचालक पदावर असताना सक्षम पोलिस अधिकारी निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि तयारी करून घेण्यावर भर दिला. कोरोना काळात राज्यातील बरेच ट्रेनिंग सेंटर बंद असतानाही ७०० पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे श्रेय अश्‍वती दोरजे यांना जाते. दोरजे यांच्या निर्णयामुळेच महाराष्ट्राला ७०० अधिकारी मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यांना महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

"महिला किंवा पुरुष असा भेदभाव पोलिस खात्यात मुळीच नसतो. त्यामुळे तरुणींनी मनात कोणतीही अडगळ न ठेवता बिनधास्तपणे पोलिस खात्यात भरती व्हावे. पालकांनीसुद्धा पोलिस विभागाकडे मुलींचा कल असेल तर त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघावे."

- अश्‍वती दोरजे, सहपोलिस आयुक्त, नागपूर

loading image
go to top