Nagpur Tragidy: आजाराच्या वेदना असह्य, मायलेकाने कवटाळले मृत्यूला; कोतवालीतील हृदयद्रावक घटना; विषारी औषध घेऊन जीवन संपविले
Mother and Son Found Lifeless in Nagpur: नागपूरच्या कोतवाली परिसरात गंभीर आजाराच्या वेदनांमुळे आई आणि मुलाने विषारी औषध सेवन करून जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. पोलिस तपास सुरू आहे.
नागपूर: गंभीर आणि दुर्धर आजाराच्या वेदना असह्य झाल्याने मायलेकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना कोतवाली परिसरातील श्री गुरु माऊली अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.