

Nagpur Accident News
esakal
साळवा (कुही): कुही ते पाचगाव मार्गावरील नवरगाव शिवारात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव बोलेरोने धडक दिल्याने दुचाकीवरील मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. दिनेश मुरलीधर ठाकरे (वय ३२), आई सत्यफुला मुरलीधर ठाकरे (वय ६२) दोघेही रा. मेंढेगाव अशी मृतांची नावे आहेत.