नागपूर: चाकू घेऊन युवकाला मारण्यासाठी आलेल्या युवकाचा तिघांनी खून केला. ही घटना बुधवारी (ता. १२) मध्यरात्री कुशीनगरातील एनआयटी गार्डन परिसरात घडली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. .राजवीर सोहनकुमार शर्मा (वय १८ रा. कुशीनगर) असे मृताचे नाव असून राज इलमकर (वय २२), रोहित इलमकर (वय २०) आणि हनी डोंगरे (वय २५, सर्व रा. कुशीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजवीर याचा पाच दिवसांपूर्वी वाढदिवस झाला..Al Qaeda Attack: लाल किल्ला दहशतवादी हल्ल्यामागे ‘अल कायदा’; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा.काही दिवसांपूर्वी राजवीरचा मोठ्या भावाचा राजसोबत वाद झाला होता. बुधवारी (ता. १२) राजचा वाढदिवस असल्याने तो आपल्या दोन्ही मित्रांसोबत परिसरात केक कापत होता. तिथून राजबीर जात होता. भावाशी का भांडला असे विचारत त्याने राजशी भांडण सुरू केले. दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर राजवीर तेथून निघून गेला..काही वेळात तो आपल्या सहा ते सात मित्रांसह परत आला. त्याने पुन्हा राजसोबत वाद घालत त्याला मारण्यासाठी चाकू काढला. झटापटीत राजने चाकू हिसकावून घेत त्याच्यावरच वार केला..Pune Accident : कात्रज चौकात PMPML बसचे ब्रेक फेल, चालकाचे नियंत्रण सुटले; ४ ते ५ वाहनांना धडक....त्याचा मित्र नयन सोनबरसे वाचविण्यासाठी आला असता, त्याच्यावरही राज आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला करीत जखमी करीत पळून गेले. घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून राजवीरला मृत घोषित केले, तर नयनवर उपचार सुरू आहेत. फरार मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.