नागपूर : लुपस विकाराच्या १० रुग्णांमध्ये ९ महिला

रोगप्रतिकारक शक्तीचा आपल्याच अवयवांवर होतो हल्ला
Nagpur lupus SLE disease its mostly found in women
Nagpur lupus SLE disease its mostly found in womensakal

नागपूर : स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अवयवांवर हल्ला चढवितात तेव्हा लुपस विकाराची लागण होते. यालाच एसएलई असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. हा एक वातरोग असून पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त आढळतो. दहा रुग्णांपैकी नऊ रुग्ण महिला असतात. प्रजननक्षम महिलांसह लहान वयातील मुलींमध्ये लुपस विकार आढळतो. चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकाराचे लाल चट्टे (बटरफ्लाय रॅश) येणे सुरू होते हे या विकारांचे प्रमुख लक्षण आहे, अशी माहिती वातरोगतज्ज्ञ डॉ. तन्मय गांधी यांनी दिली.

लुपस या वातरोगाबाबत समाजात जागृती नाही. यामुळे १० मे हा जागतिक लुपस दिवस पाळला जातो. हेच निमित्त साधून डॉ. गांधी यांनी सोमवारी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. या विकाराचे एक लाख व्यक्तींमध्ये ३ ते ४ रुग्ण आढळतात. या विकारात एकाच वेळी शरीरातील अन्य अवयवांवर हल्ला करीत असल्याने या विकारावर वेळेत उपचार करणे आवश्यक आहे. लुपस विकारामुळे महिलांमध्ये गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होते. वारंवार गर्भपात होतो, यामुळे याच्या लक्षणांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगतानाच एक्स क्रोमोजोम आणि फिमेल सेक्स हॉर्मोन्स यासाठी कारणीभूत ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिलांमध्ये लक्षणे आढळल्यानंतरही त्या लपवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे हा आजार अधिक वाढतो आणि रुग्णाच्या अन्य अवयवांवरही प्रभाव पडतो. गर्भधारणेस विलंब आणि गर्भपातासारख्या समस्या उद्भवतात. या विकारात लघवीद्वारे प्रोटिनचे विसर्जन जास्त होते, यामुळे किडनीला लुपस विकार ग्रासतो. योग्य वेळेतील उपचारांनी मातृत्वास काही अडचण येत नाही. सामान्य जीवन जगता येते.

- डॉ. तन्मय गांधी,वातरोगतज्ज्ञ, नागपूर.

शरीराच्या विविध भागात दिसणारी लक्षणे

  • सांधे दुखणे-सुजणे व अकडणे

  • वारंवार ताप येणे

  • चेहेऱ्यावर लाल चट्टे येणे

  • केस गळणे

  • महिलांमध्ये टक्कल पडणे

  • हातांच्या बोटांचा रंग निळा, काळा होणे

  • हृदय वा फुफ्फुसात पाणी जमा होऊन धाप लागणे

  • डोकं दुखणे फिट येणे

  • पक्षाघात होणे मानसिक आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com