नागपूर : म. गांधींच्या पुढाकारातून बांधली वंचितांसाठी विहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 well built for underprivileged

नागपूर : म. गांधींच्या पुढाकारातून बांधली वंचितांसाठी विहीर

नागपूर : हरिजनांच्या वस्तीतील लोकांना साधे पाणीही मिळत नव्हते, त्यांना कोणी घरी बोलावीत नव्हते. त्यांची सावलीसुद्धा नको वाटत असे. त्यांच्यासाठी परिसरात एक विहीर बांधण्यात यावी’ अशी सूचना सुदर्शन समाजाप्रती असणाऱ्या आस्थेपोटी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्थानिक इंग्रज प्रशासनाला दिली आणि बोरकरनगरमध्ये विहीर बांधायला लावली. पारतंत्र्यात याच विहिरीने या समाजाची तहान भागविली होती. आजही ही विहीर समानतेचा वारशाची सुरुवात म्हणून शहराच्या मध्यभागी कायम आहे.

आजही सुदर्शन समाजातील नागरिकांचे बोरकरनगर परिसरात वास्तव्य आहे. आजच्या काळाच्या उलट स्थिती त्या काळी होती. एकीकडे पारतंत्र्य व दुसरीकडे उच्च वर्णीयांकडून अतिशय तुच्छ वागणूक, अशी या समाजाची त्याकाळी परिस्थिती होती. परिश्रमाचा ना पुरेसा कामाचा मोबदला, ना खायला पुरेसे अन्न, अशी बिकट अवस्था असल्याने समाजाला विहीर बांधणेही त्यांना शक्य नव्हते. दुसरीकडे, गावातील गटार आणि परिसर स्वच्छ करता-करता या लोकांचे शरीरच अस्वच्छ होत होते.

पारतंत्र्यात या समाजाचे यांचे होणारे हाल महात्मा गांधींना बघेनासे झाले. त्यांनी इंग्रज प्रशासनाला सूचना केली आणि या समाजासाठी ही विहीर बांधण्यात आली. १९३३ साली ही विहीर या समाजासाठी खुली केली गेली. सुदर्शन समाजाला उच्च वर्णीयांकडून त्या काळी मिळणारी अपमानास्पद वागणूक पाहता आजच्या पिढीला घडविण्यात या विहिरीचाही मोठा वाटा आहे. आजही या विहिरीला बाराही महिने मुबलक पाणी असते. मध्यंतरी प्रशासनाने विहिरीच्या आजूबाजूला तटबंदी केली. मात्र, ही बाब पुरेशी नसून समाजासाठी या विहिरीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. दस्तुरखुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुढाकारातून ही विहीर बांधण्यात आल्याने शहराच्या मध्यभागी गांधीजींच्या चरण स्पर्शाने पावन झालेला हा परिसर आणि ही विहीर नागपूरला मिळालेल्या वारशापैकी एक आहे.

Web Title: Nagpur Mahatma Gandhi Initiative To Well Built For Underprivileged

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..