Nagpur Crime : जिवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी
Extortion Case : नागपूरमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने दुसऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे.
नागपूर : रस्त्यावर कोंडी होईल म्हणून दुसरीकडे वाहन लाव म्हटल्याने साथीदारासह जिवे मारण्याची धमकी देत, पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्यास तहसील पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (ता.९) मध्यरात्री साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली.