Crime News: बहीण-जावयाला दिलेले ₹५ लाख परत मागितल्यावर पतीने पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला. घटना नागपूरमध्ये घडली असून पतीला अटक करण्यात आली आहे.
नागपूर : बांधकामासाठी बहीण जावयाला उधार दिलेले पैसे परत आणण्याचा तगादा लावत पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यावर वार करून तिला ठार करण्याच्या प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली.