

Nagpur
esakal
नागपूर: शहरातील वर्दळीच्या मंगलमूर्ती चौकात आता मद्यपींनी ताबा मिळवला असून, सार्वजनिक रस्त्याचे रूपांतर थेट ‘ओपन बार’मध्ये झाले आहे. महापालिकेने सुशोभीकरणासाठी लावलेल्या दाट झाडांच्या आडोशाने तळीराम डिव्हायडरवरच मद्य प्राशन करीत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे.