

Nagpur Crime Case
esakal
नागपूर: मानकापूर परिसरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर ३८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. औषध घेतल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा पतीने केला होता. शवविच्छेदन अहवालातून मात्र तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.