
नागपूर : चला नागपूरकर, स्वस्थ आरोग्यासाठी धावू एकत्र...’ असा संदेश देणाऱ्या ‘सकाळ मॅरेथॉन’च्या निमित्ताने हजारो नागपूरकर रविवारी रस्त्यावर धावण्यासाठी उतरले. दहा आणि तीन किमीच्या या स्पर्धेत हजारो धावपटूंची गती वेगवेगळी होती; मात्र, ते धावत होते एक’दिला’ने.
तेसुद्धा आपल्या सुदृढ आरोग्यासाठी. धावपटूंचे टशन बघून अनेकांना हुरुप चढत गेला आणि असे आयोजन वारंवार व्हावे अशी दिलसे प्रतिक्रिया नागपूरकरांनी दिली. ती ‘सकाळ’च्या उत्तम आयोजनाची पावतीच होती.