Matrimonial Fraud: मेट्रीमोनिअल साईटवरील मैत्री पडली महागात ! मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवत तरुणीला घातला गंडा

विवाहविषयक ॲपवर ओळख झालेल्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून ७७ हजार ३०४ रुपयांनी गंडविण्यात आले.
Matrimonial Fraud: मेट्रीमोनिअल साईटवरील मैत्री पडली महागात ! मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवत तरुणीला घातला गंडा

Amravati Matrimonial Site Fraud: विवाहविषयक ॲपवर ओळख झालेल्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून ७७ हजार ३०४ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनव प्रकाश राऊत, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शहरातील एका तरुणीने आपल्या मोबाईलवर विवाहविषयक एक अॅप डाउनलोड केले. या अॅपच्या माध्यमातून ती लग्नासाठी मुलांचा शोध घेत होती. त्याचवेळी या अॅपद्वारे तिची ओळख अभिनव राऊत याच्यासोबत झाली. त्याने तिला आपली प्रोफाइल पाठविली. त्यानंतर दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली. त्यादरम्यान अभिनवने तरुणीला आपली मंत्रालयात ओळख असून मी तुला जॉब लावून देतो, अशी बतावणी केली.(Latest Marathi News)

नोकरीच्या नावावर त्याने विविध कारणे सांगून तरुणीला पैशांची मागणी केली. त्यानुसार तरुणीने त्याच्या बँक खात्यात यूपीआयद्वारे ७७ हजार ३०४ रुपये पाठविले. परंतु, त्यानंतरही तिला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तरुणीने अभिनवकडे पैसे परत मागितले. त्यावर अभिनवने तिला शिवीगाळ करून धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अभिनवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Matrimonial Fraud: मेट्रीमोनिअल साईटवरील मैत्री पडली महागात ! मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवत तरुणीला घातला गंडा
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com