

Nagpur News:
esakal
नागपूर: जवळपास महिनाभरापासून उन्हाचे तीव्र चटके सहन करीत असलेल्या नागपूरकरांना मंगळवारी अवकाळी पावसाने सुखद दिलासा मिळाला. दुपारच्या सुमारास शहरातील काही भागांत हलक्या वैशाखसरी बरसल्याने तापमानात घट झाली. शिवाय पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन ऊन व उकाड्यापासून दिलासाही मिळाला.