

नागपूरः खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये झोनचे कर संकलन कार्यालय हलविल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी येथे पोहचून आज (मंगळवार) सायंकाळपर्यंत हॉल रिकामा न झाल्यास 2 जुलैला नगरसेवकांसोबत उपोषणाला बसणार, असा इशारा दिला.
हनुमाननगरातील बॅडमिंटन हॉलमध्ये कर संकलन कार्यालय हलविल्याचा विरोध करीत आज सकाळी 11 वाजता नगरसेवक डॉ. छोटू भोयर, उषा पॅलट, शीतल कामडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी हॉलला कुलूप ठोकले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. परिसरातील मुलांना खेळण्यासाठी या हॉलची निर्मिती करण्यात आली. नूतनीकरणाचे काम संपुष्टात आल्यानंतर लोकार्पणाचा नगरसेवकांचा बेत होता. परंतु, त्यापूर्वीच प्रशासनाने कर संकलन कार्यालय तेथे स्थानांतरीत केले. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक आणि नागरिकांनी हॉलला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना आतमध्ये बंद केले.
वाचा- 50 मिनिटे चालला जीवन-मृत्यूचा संघर्ष, अखेर तो जिंकला...
महापौरांना नगरसेवकांच्या संतापाबाबत माहिती मिळताच तेही येथे पोहोचले. प्रशासनाच्या या कृतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मैदाने, विविध खेळांसाठी आवश्यक हॉल आदी साधने उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असताना उपलब्ध साधने प्रशासकीय कार्यासाठी बळकावणे, हे मनपा प्रशासनाला शोभणारे नाही, या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सहायक आयुक्तांना कारणे दाखवा
येथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौर संदीप जोशी तेथे पोहोचणार असल्याची माहिती असतानाही हनुमाननगरच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे यांनी मुख्यालयात बैठकीचे कारण सांगून तेथे येण्यास असमर्थता दर्शविली. यावर महापौर संदीप जोशी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.