

नागपूर : दारिद्य्ररेषेंतंर्गत (बीपीएल) यादीतील रुग्णांसाठी कोणत्याही मेडिकलमध्ये मोफत उपचार होत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केवळ नागपुरातील मेडिकलमध्ये बीपीएलग्रस्तांचा ‘एमआरआय’ मोफत काढण्यात येतो. तर मेयोत गरीब रुग्णांकडून अवैध शुल्क वसुली असल्याची माहिती पुढे आली आहे. मेयो प्रशासन कोणत्या आधारे शुल्क वसुल करीत आहे, असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
विदर्भात कधीकाळी केवळ मेडिकलमध्ये एमआरआय यंत्र होते. मात्र दोन वर्षांपासून मेडिकलमधील यंत्र बंद आहे. विदर्भातील बीपीएलग्रस्तांना एमआरआय काढण्यासाठी मेडिकलमध्येही शुल्क आकारले जात होते. परंतु ही बाब दै. सकाळने प्रकाशात आणली. बीपीएलग्रस्तांचा हा लढा सकाळने लढवला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होतात. त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. सारे शेतकरी बीपीएलग्रस्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी एमआरआय निदानासाठी पैसा कुठून आणायचा, असा सवाल पुढे येतो.
त्यावेळी तत्कालिन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मेडिकलमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेत. शेतकरी तसेच बीपीएलग्रस्तांना एमआरआय यंत्रावरील निदानाचा लाभ मिळावे अशी सूचना केली. बीपीएलग्रस्तांकडून एमआरआय निदानाचे शुल्क आकारले जाऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली. शासनस्तरावर वैद्यकीय शिक्षण व शुल्क विभागाकडून तत्कालिन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या काळात बीपीएलग्रस्तांकडून शुल्क माफीचा निर्णय झाला. तसा अध्यादेश जारी केला. तेव्हापासून मेडिकलमध्ये मोफत एमआरआय होते. मात्र
'मेडिकलमध्ये दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या (बीपीएल) रुग्णांकडून पूर्वी शुल्क आकारले जात होते. मात्र आता तेथे एमआरआय मोफत होतो. मेडिकलमध्ये मोफत आणि मेयोत शुल्क वसुली असा नियम असू शकत नाही. मेयोच्या अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांनी यासंदर्भात माहिती घ्यावी. लवकरच संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.'
-अनिकेत कुत्तरमारे, सैनिक, समता सैनिक दल, नागपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.