Nagpur : मेडिकल व मेयोत ३ दिवसांत ५९ मृत्यू ;खासगीतून मेडिकलमध्ये रेफर केलेल्या ३४ रुग्णांचा समावेश

दलालांमार्फत खासगी रुग्णालयात रुग्ण पोचताच पोहचवणाऱ्याचे ‘कमिशन'' मिळते
nagpur
nagpursakal

नागपूर - १ ते ३ ऑक्टोबर या तीन दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४३ तर मेयो रुग्णालयात १६ असे एकूण ५९ मृत्यू झाले असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

रात्री अपरात्री खासगी रुग्णालयातून मेडिकलमध्ये रेफर केलेल्या ३४ रेफर केलेल्या रुग्णांचा या मृतकांमध्ये समावेश आहे. आर्थिक पिळवणूक झाल्यानंतर ३४ जणांना खासगीतून रेफर करीत त्यांच्या मरणाची सोय मेडिकल करण्यात आली. रुग्ण मृत्यू पावला की, या रुग्णाच्या नातेवाइकांच्या हाती मेडिकल, मेयो या सरकारी रुग्णालयातून ‘डेथ सर्टिफिकेट’ मिळते, हे विशेष.

दलालांमार्फत खासगी रुग्णालयात रुग्ण पोचताच पोहचवणाऱ्याचे ‘कमिशन'' मिळते. आणि तेथून रुग्णांकडून अधिकचे पैसे घेऊन उपचार सुरु होतात. रुग्णाजवळचे पैसे संपल्यानंतर मात्र शहरातील अनेक खासगी रुग्णालये पुन्हा मृत्यूच्या दाढेत पोचलेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये रेफर करतात. रुग्णाची आर्थिक पिळवणूक झाल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांच्या लक्षात येते, मात्र नातेवाइकांजवळही पर्याय नसतो. खासगीतून मेयोत रेफर केलेल्या रुग्णांची माहिती मात्र मिळू शकली नाही.

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

मेडिकलमध्ये रात्रीच्या वेळेस गंभीर खालावलेल्या अवस्थेत खासगीतून रुग्णांना रेफर केले जाते. सरकारी रुग्णालय असल्याने रुग्णांचा हक्क आहे, त्यांना रुग्णसेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे. ते आम्ही पार पाडतो. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रुग्ण रेफर होऊन येतात. यांनादेखील आम्ही सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करतो. २ ऑक्टोंबर ८ व्हेंटिलेटवरील आणि ७ अतिदक्षता विभागात रेफर होऊन आलेले ७ असे एकूण १५ रुग्ण खासगीतून अत्यवस्थ स्थितीत आले. ते रुग्ण दगावले आहे. मेडिकलमध्ये औषध साठा आहे.

डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधिक्षक, मेडिकल रुग्णालय, नागपूर.

nagpur
Nagpur News : नागपूरमध्ये होणार पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com