Medicine : औषधी घेताना वेळेचे नियोजन बंधनकारक; बहुतांश रुग्णांकडून औषधी घेताना होतात चुका

अनेक आजारांवर रुग्ण डॉक्टरांच्या सल्याशिवाय सर्रास औषधी घेतात. तसेच डॉक्टरांकडे गेल्यावरही प्रिस्क्रिप्शन नुसारच आपण औषधी घेतो असेही नाही.
Medicine
Medicinesakal
Summary

अनेक आजारांवर रुग्ण डॉक्टरांच्या सल्याशिवाय सर्रास औषधी घेतात. तसेच डॉक्टरांकडे गेल्यावरही प्रिस्क्रिप्शन नुसारच आपण औषधी घेतो असेही नाही.

नागपूर - अनेक आजारांवर रुग्ण डॉक्टरांच्या सल्याशिवाय सर्रास औषधी घेतात. तसेच डॉक्टरांकडे गेल्यावरही प्रिस्क्रिप्शन नुसारच आपण औषधी घेतो असेही नाही. कारण, औषधी घेण्याच्या पद्धतीमध्ये अनेकांकडून चुका होतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते दोन वेळा, तीन वेळा औषधी सेवन करण्याचा सल्ला दिला असल्यास त्यामध्ये विशिष्ट अंतर असणे गरजेचे आहे.

रिकाम्या पोटी औषध का घेऊ नये?

रिकाम्या पोटी औषध घेऊ नये, असे सामान्यतः मानले जाते. प्रतिजैविकांचा प्रभाव इतका गरम असतो की ते घेण्यापूर्वी थोडंफार खाणे आवश्यक आहे, असेही तुम्ही ऐकले असेल. प्रत्येक औषधाची शरीरात विरघळण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळेच, काही औषध जेवणापूर्वी, काही जेवताना आणि काही जेवणानंतर घेण्यास सांगितले जातात.

जेवणा आधी आणि नंतर म्हणजे?

औषध घेण्यापूर्वी प्रिस्क्रिप्शन नीट वाचा. जेवणापूर्वी औषध घेण्याचे निर्देश दिल्यास औषध घेतल्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतरच अन्न खावे. जेवणानंतर औषधी घेण्याच्या सूचना असल्यास अन्न पचण्याची वाट पाहू नका, लगेच औषध घ्या.

रिकाम्या पोटी औषध कसे घ्यावे?

काही औषधे रिकाम्या पोटी घ्यावी लागतात. अशी औषधी एकतर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घ्या, किंवा जर तुम्ही ते विसरलात तर लक्षात ठेवा की औषध घेतल्यानंतर दोन तास आधी आणि नंतर काहीही खाऊ नये. कारण, अन्न शरीरात औषधी विरघळण्याची प्रक्रिया वेगवान किंवा मंद करू शकतात. म्हणूनच योग्य वेळी घेतलेल्या औषधाचा परिणाम लवकर दिसून येतो.

बरे वाटल्यानंतर औषधी थांबवावीत का?

औषधे घेण्याची मुदत डॅाक्टरांनी ठरवून दिलेली असते. बरे वाटल्यानंतर लगेचच औषधी कधीही बंद करायची नसतात. ती ठरवून दिलेल्या दिवसापर्यंत घ्यायचीच असतात. ती मध्येच बंद केली तर दुखणे पुन्हा बळावू शकते. (टीप : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे न घेतल्यास वेदना कमी होण्याऐवजी वाढू शकतात. साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com