Nagpur Metro
Nagpur MetroSakal

Nagpur Metro : महाकार्डने नागपूरकरांचा प्रवास झाला सूकर

मोबाईल ॲप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डच्या वापरामुळे नागपूरकरांचा प्रवास कॅशलेस झाला.

नागपूर - महामेट्रोने मेट्रोतून प्रवासासाठी सतत डिजिटल माध्यमांवर भर दिला. मोबाईल ॲप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डच्या वापरामुळे नागपूरकरांचा प्रवास कॅशलेस झाला. गेल्या काही महिन्यांत महाकार्डवर प्रवासासाठी सवलती दिल्याने ७० हजार नागरिकांनी हे कार्ड खरेदी केल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. महाकार्डने प्रवास केल्यास प्रवासी भाड्यात दहा टक्के सवलत देण्यात येत आहे.

महाकार्डच्या माध्यमातून नागपूर मेट्रो विविध सवलती देत आहेत. त्यामुळे महाकार्डच्या खरेदीला नागरिक पसंती देत आहे. कॅशलेस प्रवासासाठी महामेट्रोने युरो, मास्टर, व्हीसा स्मार्ट कार्ड आधारित एएफसी प्रणाली स्वीकारली आहे. शहरातील सर्वच मेट्रो स्टेशनवर ही प्रणाली लागू करण्यात आली.

या प्रणालीच्या माध्यमातून प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) द्वारावर केवळ महाकार्ड टॅप करावे लागते. त्यातून प्रवासी भाड्याची कपात होते. महाकार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्डमधून वजा केले जाते. मेट्रो स्थानकांवर महाकार्डची खरेदी तसेच टॉपअप सहज शक्य आहे.

मुदत आता १४ ऑगस्टपर्यंत

महाकार्डने प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या ३० टक्के सवलतींमुळे मेट्रो प्रवास जास्त लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे महामेट्रोने २०० रुपयांच्या टॉपअप करून महाकार्ड मोफत देण्याची मुदत आता १४ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. यात अत्यंत सुरक्षित चिपचा वापर करण्यात आला आहे.

अनेक सोयी-सुविधा उपलब्ध

हे कार्ड स्वाईप करता येते. या कार्डने प्रवास स्वस्त झालाच, तिकिटांसाठी लागणाऱ्या कागदांची बचत होत आहे. परिणामी कचरा टाळला जात असून हे कार्ड पर्यावरणपूरक देखील आहे. महामेट्रोने आजपर्यंत प्रवाशांच्या दृष्टीने अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत सुरू असून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकएंड सवलत, दैनिक पास फक्त १०० रुपयांत उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com