

Nagpur News
esakal
नागपूर: उंच इमारती, रुंद रस्ते, सर्वत्र झगमगाट, शहराच्या विकासाची ही चमकदार बाजू ज्यांनी खांद्यावर लिलया पेलली, त्या हजारो स्थलांतरित बांधकाम मजुरांच्या अधिकृत नोंदी तर सोडाच त्यांना प्राथमिक सुविधाही मिळतात की नाही, हे पाहण्यासाठीही कुणाला सवड नाही. मजुरांना नोंदणीसह ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थलांतरित एकाही मजुराची अधिकृत नोंदणी झाली नसल्याचे वास्तव आहे.