
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका जुन्या खाणीच्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, ही हत्या, आत्महत्या की अपघात आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.