नागपूर : सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Nagpur Girl Assault Case) एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं आहे. एका चालकाने अल्पवयीन मुलीवर कारमध्ये जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.