Nagpur News: नागपूरच्या अल्पवयीन मुलीला बिहारमधून सुरक्षित परत आणले, गुन्हेशाखेची यशस्वी कारवाई

Nagpur missing girl: नागपूरच्या कोराडी परिसरातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची बिहारमधून सुरक्षित सुटका करण्यात आली. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलासोबत ती गेल्याचे तपासात समोर आले असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

नागपूर: कोराडी पोलिस ठाणे हद्दीतून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बिहारमधून सुरक्षित परत आणले. याप्रकरणी पथकाने मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही मूळची यवतमाळ येथील असून ती नागपुरात शिकण्यासाठी आली होती. दरम्यान इन्स्टाग्रामवर मुलीची बिहार येथील मुलासोबत ओळख झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com