

Nagpur Accident
sakal
नागपूर: वर्धा रोडवरील सोमलवाडा चौक बसस्टॉपजवळ मोपेडला कारने धडक दिल्याने भीषण अपघातात जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पतीवर उपचार सुरू आहेत. ही घटना १८ फेब्रुवारीला सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.