esakal | देवा किती निर्दयी रे तू...! एकाचवेळी मायलेकीला बोलवलस...
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur mother daughter funeral

नातू अमितसुद्धा पोलिस दलात रुजू झाल्याचाही त्यांना विशेष आनंद होता. त्याच नातवाचे लग्न असल्याने विठाबाईत आनंदात होत्या. त्यांची मुलगी आणि वराची आत्या वंदना यासुद्धा भाच्याचे लग्न असल्याने आनंदात होत्या. अन्य नातेवाईकांप्रमाणे त्यांनीही लग्नसोहळ्यात आपल्या परिने आनंद घेतला.

देवा किती निर्दयी रे तू...! एकाचवेळी मायलेकीला बोलवलस...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : नातवाचे लग्न असल्याने अन्य नातेवाईकांसोबतच आजीसुद्धा आनंदी होती. इच्छेप्रमाणे मौज, हौस भागवून घेतली. लग्नसोहळा आटोपून वऱ्हाड परतीच्या प्रवासाला निघाले. वऱ्हाड्यांच्या खासगी बसवर अचानक काळाने झडप घातली. त्यात वराची आजी आणि आत्यासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला. या मायलेकीवर शनिवारी सायंकाळी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांना हुंदके आवरणे कठीण झाले होते.


विठाबाई तुकाराम झिलपे (72) रा. विश्‍वकर्मानगर, मानेवाडा रोड असे आईचे तर करुणा ऊर्फ वंदना विजयराव खोंडे (57) रा. चंदननगर असे मुलीचे नाव आहे. दोन्ही मुले पोलिस दलात असल्याचा विठाबाई यांना अभिमान होता. नातू अमितसुद्धा पोलिस दलात रुजू झाल्याचाही त्यांना विशेष आनंद होता. त्याच नातवाचे लग्न असल्याने विठाबाईत आनंदात होत्या. त्यांची मुलगी आणि वराची आत्या वंदना यासुद्धा भाच्याचे लग्न असल्याने आनंदात होत्या. अन्य नातेवाईकांप्रमाणे त्यांनीही लग्नसोहळ्यात आपल्या परिने आनंद घेतला.

नातलगांना हुंदके अनावर
रात्री 3 वाजताच्या सुमारास वऱ्हाडी मंडळी खासगी बसमधून परतिच्या प्रवासाला निघाली. वाटेतही लग्नसोहळ्यावरच चर्चा सुरू होती. रात्र फार झाल्याने काहींचा डोळा लागला होता. नेमके त्याचवेळी काळ त्यांचा पाठलाग करीत होता. मौद्या जवळच्या शिंगोरी शिवारात कंटेनर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या रूपात काळही उभा ठाकला होता.

त्या चौघी आंघोळीला गेल्या अन्‌ घडला असा प्रसंग... प्रश्नचिन्हतील घटना 

भरधाव बस मागून त्यावर धडकली आणि काळाने चौघांवर झडप घातली. त्यात मायलेकीसह वराचा मामेभाऊ आनंद आठवले (30) रा. रामबाग आणि बहीण जावई असणारे रेल्वेचे खाणसामा सतीश जांभूळकर (35) रा. तिरोडा यांचाही समावेश होता. वंदना आणि आनंद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मौदा येथील रुग्णालयात विठाबाई आणि सतीश यांच्यावर काळाने झडप घातली. क्षणार्धात वऱ्हाड्यांवर शोककळा पसरली. 

बघा, यवतमाळचा वाहतूक पोलिस किती हक्काने वसुली करतो...
 

मानेवाडा घाटही गहिवरला 
मायलेकीची एकत्र अंत्यात्रा काढण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. विश्‍वकर्मानगरातील लाईन नंबर 1 येथून सायंकाळी अंत्ययात्रा निघाली. यावेळी नातेवाईकांच्या संयमाचा बाध फुटला आणि त्यांनी अश्रृंना वाट मोकळी करून दिली. मानेवाडा घाटावर एकमेकीच्या शेजारीच मायलेकींना एकाचवेळी अग्नी देण्यात आला. 

loading image