नागपूर : राष्ट्रवादीशिवाय मनपात कुणीही सत्तेत येणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Muncipal corporation election NCP MP Praful Patel

नागपूर : राष्ट्रवादीशिवाय मनपात कुणीही सत्तेत येणार नाही

नागपूर : सध्या नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. या दोनचे वीस कसे होतील, याचा विचार करावा. राष्ट्रवादी कॉंग्रेसशिवाय महापालिकेत कुणीही सत्तेत येणार नाही, अशी स्थिती निर्माण करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

काटोल रोडवरील एका खाजगी सभागृहात त्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जि. प. सदस्य सलील देशमुख, माजी खासदार सुबोध मोहिते, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, उपाध्यक्ष रविनीश पांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

ते म्हणाले, २००४ मध्ये विदर्भातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ११ आमदार निवडून आले होते. राज्यातही राष्ट्रवादीचे आमदार कॉंग्रेसपेक्षा जास्त होते. परंतु मुख्यमंत्रीपद कॉंग्रेसला देण्यात आले. त्यावेळी विदर्भातील आमदार जास्त असल्याने राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद विदर्भात दिले असते तर आज या भागात पक्षाची मोठी ताकद निर्माण झाली असती, असे त्यांनी नमुद केले. यापुढे आघाडी करताना सन्मानाने जागा मिळाल्या तरच पुढचे पाऊल टाकण्यात येईल, असे नमुद करीत त्यांनी कॉंग्रेससोबत आघाडीबाबत सावध राहण्याच्या सूचना येथील पदाधिकाऱ्यांना केल्या.

महापालिकेत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी गल्लीपर्यंत पोहचावे लागणार आहे. कुणीही व्हीआयपी नाही. मी सुद्धा नागपुरातील गल्लीपर्यंत जाण्यास तयार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी गल्लीपर्यंत जाण्याची तयारी ठेवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Nagpur Muncipal Corporation Election Ncp Mp Praful Patel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top