शाळेत झुडपं की झुडपांत शाळा!

नागरिकांच्या तक्रारी कचऱ्यात; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, नागरिकांनाही होतोय मनस्ताप
शाळेत झुडपं की झुडपांत शाळा!
शाळेत झुडपं की झुडपांत शाळा!sakal

सुभेदार ले आउट : सुभेदार ले-आउटसारख्या पॉश परिसरात महापालिकेची नावाजलेली दुर्गानगर माध्यमिक शाळा असून इमारतीमागील विहीर परिसरात झुडपं वाढली आहे. या झुडपातून अनेकदा तीन ते सहा फुटापर्यंत साप बाहेर निघाल्याचे परिसरातील नागरिकांनी नमुद केले. आता शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे. परंतु येथील नागरिकांनी शाळेच्या मागे वाढलेली झुडपं कापण्यासाठी महापालिकेला अनेकदा तक्रारी केल्या. परंतु महापालिकेने दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील निवासी नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विहिरीतील पाण्याच्या दुर्गंधीने त्रस्त

या झुडपात जुनी विहीर असून संपूर्ण पाणी घाण झाले आहे. या पाण्याची सायंकाळी परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचेही नागरिकांनी नमुद केले. ही विहीर स्वच्छ केल्यास शाळेच्या परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देण्याच्या कामात येऊ शकते. त्यामुळे या विहिरीची स्वच्छतेकडेही नागरिकांनी लक्ष वेधले. विहिरीतील पाण्याचा वापर शाळेतील प्रसाधनगृहातही होऊ शकते. परंतु अनेक वर्षांपासून या विहिरीकडेही दुर्लक्ष होत आहे. विहीर तुडुंब भरली असून यातील पाण्याच्या गारव्यामुळे सापांचे येथे कायम वास्तव्य असल्याचेही नागरिकांनी नमुद केले.

झाडांच्या फांद्यांचा विद्युत तारेला स्पर्श

शाळेच्या आवारात रांगेने मोठी झाडे असून त्यांच्या फांद्या समोरच असलेल्या घरांपर्यंत आल्या आहेत. विशेष म्हणजे या फांद्या विद्युत तारांना स्पर्श करीत आहे. त्यामुळे एखादवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झाडांच्या पानांचा कचराही मोठ्या प्रमाणात अंगणात पडत असल्याने गृहिणींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसातून कितीदा पालापाचोळ्याची स्वच्छता करावी, असा प्रश्न येथील विजया निनावे यांनी उपस्थित केला. याबाबतही अनेकदा निवेदन दिले. परंतु महापालिकेकडून झाडे कापण्यास आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे नागरिकांनी नमुद केले.

शाळेत झुडपं की झुडपांत शाळा!
IND vs PAK : धमाकेदार विजयानंतर बाबर म्हणाला, हा फक्त ट्रेलर!

रस्त्यांवरील नागरिक बचावले

शाळेच्या मैदानाभोवती मोठी झाडे आहेत. ही सर्व झाडे रस्त्यांवर झुकलेले आहेत. झाडांच्या फांद्या मोठ्या असून वादळाने त्या पडतात. यापूर्वी रस्त्यांवरच या मोठी फांदी पडली. सुदैवाने यात कुणीही नागरिक सापडला नाही. या झाडांच्या फांद्या नियमानुसार कापण्यासाठीही महापालिकेला निवेदन, अर्ज, तक्रार करण्यात आली. परंतु या तक्रारीही केराच्या टोपलीत टाकण्यात आले. वादळामुळे फांदी पडून एखाद्याचे प्राण गेल्यानंतरच महापालिकेला जाग येईल काय? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. झाडांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालीका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिक त्रस्‍त झाले असून त्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चारवेळा निघाला साप

"शाळेच्या मागेच झुडपं आहे. यातून आतापर्यंत तीन ते चारवेळा मोठा साप निघाला. शाळेतील मुलांचे प्रसाधनगृह याच भागात आहे. त्यामुळे त्यांची कायम ये-जा असते. एखादवेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे."

- किशोर हटवार, स्थानिक निवासी

अपघाताची नेहमीच भीती

"वाढलेल्या झुडपं रस्त्यावर झुकलेले आहे. येथे वळण रस्ता असून या झुडपांमुळे पलीकडच्या रस्त्यावरून येणारे वाहन दिसून येत नाही. किंवा घरासमोरील रस्त्यावर लहान मुले खेळत असतील, तर तेही दिसत नाही. त्यामुळे कायम अपघाताची टांगती तलवार आहे."

-भरत नरुले, स्थानिक निवासी.

विद्युत खांबामुळे डोकेदुखी

:शाळेतील वाढलेल्या झाडांच्या फांद्या आमच्या घरापर्यंत आल्या आहेत. घरापुढेच विद्युत खांब असून झाडांच्या फांद्या तारांना स्पर्श करतात. एखादवेळी विजेचा धक्का लागून दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही."

-अंबिका मेश्राम, स्थानिक रहिवासी

मनपा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

"विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्यामुळे परिसरातील सात-आठ घरांत दहशत आहे. झाडे मोठी असून घरांच्या दिशेने वाकलेली आहेत. झाडांची फांदी कोसळल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. महापालिकेने या फांद्या कापून संभाव्य अपघात टाळण्याची गरज आहे."

- नत्थुजी निनावे, ज्येष्ठ नागरिक.

झुडपांमुळे जीवितास आहे धोका

सुभेदार ले-आउट येथे महापालिकेची दुर्गानगर प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. पूर्वेला शाळेचे प्रवेशद्वार असून उजव्या बाजूला वाढलेले झुडपं दिसून येत आहे. माध्यमिक शाळेच्या मागील बाजूलाच जुनी विहीर असून त्याभोवती वाढलेल्या झुडपाकडे शाळेतील शिक्षकांचेही लक्ष जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या मागील बाजूस पूर्वी विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृह होते. प्रसाधनगृह तोडून नवीन जागेवर बांधकाम केले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात झुडूप वाढली आहे.

या झुडपातून अनेकदा साप निघाल्याचे या परिसरातील नागरिक नामदेव मेश्राम यांनी सांगितले. आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. नियमित साप निघत असल्याने या विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहेच, शिवाय परिसरातील नागरिकही दहशतीत आहेत. परिसरातील नागरिकांनी नागरी कृती समितीच्या माध्यमातून महापालिकेला प्रत्यक्ष तक्रार केली. याशिवाय ऑनलाइन तक्रारही करण्यात आली. परंतु या तक्रारीची अद्यापही महापालिकेने दखल घेतली नाही. झुडपांमुळे परिसरातील चिमुकल्यांचेही खेळणे बंद झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com