

Nagpur News
esakal
नागपूर: पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नदी-नाल्यांच्या सफाईवरून स्थायी समितीची बैठक चांगलीच गाजली. प्रशासनाकडून होत असलेल्या नदी-नाले सफाईच्या कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप सदस्यांनी करून संपूर्ण प्रक्रियेसाठी कडक देखरेख यंत्रणा उभारण्याची मागणी केली. खासगी कंत्राटदारांच्या कामांची दररोज प्रत्यक्ष पाहणी व्हावी, त्या कामांची लेखी नोंद ठेवावी, प्रत्येक कामाचा अहवाल तयार करावा, अशी मागणीही सदस्यांनी केली.