esakal | गोरेवाडा जंगल सफारी, ॲम्युझमेंट पार्कही सुरू; नागपूर महापालिकेचे नवे आदेश जारी
sakal

बोलून बातमी शोधा

sitabuldi market nagpur

गोरेवाडा जंगल सफारी, ॲम्युझमेंट पार्कही सुरू; नागपूर महापालिकेचे नवे आदेश जारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य सरकारने सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. महापालिका (nagpur municipal corporation) आयुक्त राधाकृष्णन बी. (nagpur commissioner Radhakrishna B.) यांनी शहरासाठी मंगळवारी आदेश (august new guidelines) काढले असून गोरेवाडा जंगल सफारी, ॲम्युझमेंट पार्क दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्याची मुभा दिली आहे. वाचनालये, अभ्यासिका रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा: पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

राज्य सरकारच्या आदेशानंतर व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु, रेस्टॉरंटला चार वाजेपर्यंतच परवानगी असल्याने हॉटेल संचालक नाराज आहेत. परंतु, पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी गोरेवाडा जंगल सफारी, ॲम्युजमेंट पार्क दुपारी चार वाजेपर्यंत सुरू केले आहे. परंतु, ॲम्युझमेंट पार्कमध्ये वॉटरस्पोर्टसवर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. उद्यानेही सुरू करण्यात आली आहे. मैदानावरील खेळांसाठीही सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ६ ते ९ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सभागृहातील मनोरंजक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी असली तरी पन्नास लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. लग्नात ५० लोकांना परवानगी असून दुपारी चार वाजेपर्यंत आटोपते घ्यावे लागणार आहे.

काय सुरू -

  • सर्व दुकाने, मॉल : रात्री आठ वाजेपर्यंत (शुक्रवार ते सोमवार, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत, रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू)

  • रेस्टॉरंट : दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने (सोमवार ते शुक्रवार, चारनंतर तसेच शनिवारी, रविवारी केवळ होम डिलिवरी, पार्सल सुविधा रात्री ११ वाजेपर्यंत)

  • उद्यान, मैदान : आठवड्यातील सर्व दिवस

  • क्रीडा प्रकार : सकाळी ५ ते ९, सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत

  • कार्यक्रम : सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मनोरंजन सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत

  • लग्न : दुपारी चार वाजेपर्यंत, ५० लोकांच्या उपस्थितीत

हे असणार बंद -

धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय, सिनेमा थिएटर, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, जलतरण, कोचिंग क्लासेस.

loading image
go to top