

Nagpur Election
sakal
नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण आता तापू लागले आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान जिल्ह्यातील १२ नगर पंचायती आणि १५ नगर परिषदांमध्ये राजकीय ज्वर शिगेला पोहोचला असून पुढील आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.