Chandrashekhar Bawankule : महापालिकेची निवडणूक मे महिन्यात! भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत
Municipal Elections : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे महिन्यात नागपूर महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे संकेत दिले. या निवडणुकीची सर्वांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
नागपूर : नागपूर महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे महिन्यात निवडणुका होतील, असे संकेत दिले आहेत.