
नागपूर : बहुप्रतिक्षित नागपूर महापालिका निवडणुकीचा बिगुल आता दिवाळीच्या तोंडावर वाजणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आज प्रभागरचनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार महापालिका निवडणूक ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार हे स्पष्ट झाले आहे. सध्या नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग असून, पण ही संख्या ४२ पर्यंत वाढू शकते. अंतिम प्रभाग ३ किंवा ५ सदस्यीय असू शकतो. त्यामुळे आता वाढीव लोकसंख्या, त्यानुसार आरक्षण व प्रभागाचे सिमांकन करण्याचे आव्हान आयुक्तांपुढे राहणार आहे.